[ad_1]
वाल्मीक कराड पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरण गेल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरू झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अटक झाली असती तर समाधान वाटले असते, अशी
.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, परभणी आणि बीड या दोन्ही घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत समाजाला काळिमा फासणाऱ्या आहेत. या कुटुंबांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी सरकारचीही आहे आणि आम्हीही ती घेतली आहे. मला शरण वगैरे शब्द योग्य वाटत नाही. अटक झाली असती तर मनाला थोडे समाधान वाटले असते. माझी अपेक्षा होती की सरकारने त्यांना अटक करायला हवी होती. शरण काय म्हणताय? एका माणसाची हत्या झाली आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीचे अश्रू आयुष्यात कुणीच विसरणार नाही.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पोलिस यंत्रणा त्यांना शोधतच होती. एक माणूस व्हिडीओ व्हायरल करतो. पण तो आपल्याला सापडत नाही. हे फार धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. माझा महाराष्ट्रातल्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची हिंमत कशी होऊ शकते? ज्याच्याबद्दल गेल्या अनेक आठवड्यांपासून सगळीकडे एवढा रोष आहे, तो एक व्हिडीओ काढतो. तो पोस्ट करतो आणि तरी त्याला अटक होत नाही. यावर गृहमंत्रालयाचे काय निवेदन येते याची वाट बघूयात. पोलिसांना कसे कळले नाही की हे कुठे होते? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, बीडच्या एसपींची बदली झाली तेव्हाही मी त्यांना यासाठी दोष दिला नाही. कारण कदाचित त्यांची चूक नसावी. त्यांना कुणी फोन केला हा प्रश्न आहे. फक्त पोलिसांची बदली करून हा प्रश्न सुटत नाही. त्याच्यामागे कोण आहे? हे षडयंत्र कोणाचे आहे? ती कोणती मोठी ताकद संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाचवते आहे? या मुळाशी आपण गेले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सुप्रिया सुळे यांनी सल्ला दिला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. आपण सगळ्यांनी एकत्र चर्चा करून महाराष्ट्रात या अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. याला कोणताही राजकीय रंग देता कामा नये. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा परत आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने घेतली पाहिजे.
[ad_2]
Source link
Leave a Reply