[ad_1]
डॉ. श्रीपाल सबनीस हे संवेदनशील मन जपणारे परंतु त्याच वेळी चळवळी वृत्ती असणारे समाजाच्या वेदना, प्रश्नांना पाहून त्यांच्या परिहारार्थ झटणारे, दु:ख-दैन्याला वाचा फोडण्यासाठी कार्यरत असणारे साहित्यिक आहेत, अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत
.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘विवेकनिष्ठ प्रज्ञावंत डॉ. श्रीपाल सबनीस’ या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. गौरवग्रंथाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख अध्यक्षपदी होते.
डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे , दै. केसरीचे सहसंपादक रामदास नेहुलकर, संस्कार मंदिर संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक स्वप्नील गायकवाड गौरव ग्रंथांचे संपादक शिरीष चिटणीस, यशोदीप पब्लिकेशनच्या प्रा. रुपाली अवचरे, निखिल लंभाते मंचावर होते.
चंद्रकांत दळवी म्हणाले, सबनीस यांचे व्यक्तीमत्व साधेपणाला मर्यादा नसणारे आहे. त्यांना पाहण्यापेक्षा त्यांचे साहित्य वाचणे महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांचा लढवैय्या वारसा घेऊन ते पुढे आलेले आहेत. गौरवग्रंथात समाविष्ट असलेल्या विविध लेखकांच्या लेखांविषयी दळवी यांनी याप्रसंगी टिप्पणी केली.
डॉ. देशमुख यांनी सबनीस या नावाची ‘स’ म्हणजे सर्वोत्तम साहित्यिक, ‘ब’ म्हणजे बहाद्दूर, ‘नी’ म्हणजे निरलस आणि निगर्वी तर ‘स’ म्हणजे समयसूचक आणि समीक्षक अशी फोड करत ते पुढे म्हणाले, साहित्याचे उत्तम समीक्षण व सत्य मांडणारे प्रेरणादायक साहित्यिक आहेत. डॉ. श्रीपाल सबनीस हे साहित्यावर निष्ठा असणारे मानवतावादी अष्टपैलू लेखक आहेत. ज्वलंत ज्ञानकोश असलेल्या डॉ. सबनीस यांना वाचक, सुहृदांतर्फे साहित्यरत्न पदवी बहाल करावी, असे आवाहनही केले. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मी मांडत असलेल्या भूमिकेवर सर्व जाती-धर्म-पंथातील व्यक्तींनी प्रेमच केले हे आनंददायी आहे. मानवतावादाच्या भूमिकेतून मी प्रत्येक समाजातील चांगुलपणाची, ज्ञानाची, सत्याची, संचिताची, शहाणपणाची बेरीज करायला शिकलो आहे.
रामदास नेहुलकर म्हणाले, सामाजिक प्रबोधन घडविणारा, माणसात राहणारा, वावरणारा ज्ञानवंत, विचारवंत असा साहित्यिक म्हणजे सबनीस होय.
जीवननिष्ठेप्रती प्रामाणिक असणारे, शोषित वर्गाबद्दल कणव असणारे आणि देशाला, समाजाला दिशा देताना स्पष्टपणे मते मांडणारे डॉ. श्रीपाल सबनीस आहेत, असे मत श्याम देशपांडे यांनी व्यक्त केले.
[ad_2]
Source link
Leave a Reply