[ad_1]
वाल्मीक कराडने जवळपास 22 दिवसांनंतर सरेंडर केले आहे. पुणे येथे त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्या कारणांसाठी अटक करण्यात आली हे पोलिसांनी स्पष्ट करावे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हं
.
माध्यमांशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, वाल्मीक कराड शरण आला आहे हे मला माध्यमांमुळेच समजले आहे. मात्र पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांना अटक कोणत्या कारणाने झाली आहे? ते कळाले पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांनी काय मागणी करायची हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. 20 दिवस उलटूनही वाल्मीक कराड आज सरेंडर व्हायला आला आहे.
बजरंग सोनावणे म्हणाले, राजकीय दोष कोणाचा? राजकीय दोष कोण देत आहे वाल्मीक कराडला? भाजप, अजित पवार गटाचे तीन आमदार यांनी संगळ्यांनीच वाल्मीक कराडचे नाव घेतले आहे. महायुतीचे नेतेही मागणी करत आहेत. मग त्यांचा द्वेष आहे का? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणांकडून एकच अपेक्षा आहे की या वाल्मिक कराडचे संबंध कुणाशी आहे ते तपासावे. त्यांनी पारदर्शकपणे तपास करावा. तपासातून दूध का दूध आणि पानी का पानी झाले पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे त्याला शोधलं पाहिजे ही संतोष देशमुख यांच्या मुलीची मागणी आहे. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, अशी देखील मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी कराडने स्वतःचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता. ज्यात त्याने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल ती भोगण्यासाठी मी तयार आहे, असे वाल्मीक कराडने म्हंटले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply