[ad_1]
उजनी धरणातून २६ डिसेंबरपासून पुन्हा वीजनिर्मिती सुरू झाली. त्यातून १२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. उजनी धरणातून सोलापूरसाठी औज बंधारा भरण्यासाठी साधारण दोन टीमसी पाणी सोडण्यात येत आहे. औजला पाणी पोहोचण्यासाठी १० दिवसाचा कालावधी साधारण लागेल. त्या काळ
.
दरम्यान उजनी कडाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी सांगितले की, सोलापूर शहरासाठी २६ डिसेंबर रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तेच पाणी वीजनिर्मितीसाठी सोडून ते पुढे भीमा नदीत रोटेशनप्रमाणे सोडण्यात आले आहे. आैज बंधारा भरेपर्यंत हे पाणी सोडले जाणार आहे. पुढील पाण्याचे नियोजन कालवा समितीच्या पुढील बैठकीनंतर ठरविले आहे. दरम्यान उर्जा खात्याच्या अधिका-यांनी सांगितले की, १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले असून त्यातूनच वीजनिर्मिती होत आहे.
रोज १२ मेगावॅट निर्मिती
पावसाळ्याच्या कालावधीत दोन महिने सातत्याने वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात होते. सध्या उजनी धरणातील जलसाठा १०१.५६ टक्के इतका असून २६ डिसेंबर रोजी १६०० क्युसेकने कालव्यात तर वीजनिर्मितीसाठी ४४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. येथील वीज निर्मिती प्रकल्प हा १२ मेगावॉटचा आहे. तेवढी वीज निर्मिती क्षमता असल्याने तेवढी वीज तयार होते. दररोज कमीत कमी तीन लाख युनिट वीज या ठिकाणी निर्मण होते. ती वीज नॅशनल ग्रीडला पाठवली जाते. तेथून पुढे वापरात येण्यासाठी पाठवली जाते.
[ad_2]
Source link
Leave a Reply