[ad_1]
हिंगोली तालुक्यातील परवाना निलंबन टाळण्यासाठी दुकानदाराकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची पाठराखण केली जात असल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात आता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तक्रारींची चौकशी होणार काय असा
.
हिंगोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या विरोधात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या कारभाराला वाचा फुटली आहे. यामध्ये दुकानदारांनी आर्थिक पिळवणुकीचे पुरावेच आमदार मुटकुळे यांच्याकडे सादर केल्यानंतर हे प्रकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवापर्यंत पोहोचले आहे.
त्यानंतर स्वस्त धान्याच्या दुसऱ्या संघटनेनेही पुरवठा अधिकाऱ्यांच्या काराभारा बाबत निवेदन देऊन त्यांची बदली करण्याची मागणी मंगळवारी ता. ३१ केली आहे. या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
सदर प्रकरण दडपण्यासाठी काही तथाकथीत दुकानदार सरसावले असून त्यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्या दुकानदाराने पुढाकार घेतला आहे त्या दुकानदाराचा परवाना निलंबीत करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर केला आहे. मात्र या प्रस्तावावर अद्यापही कुठलीही कार्यवाही झाली नाही. तर दुकानदाराकडून परवाना निलंबन टाळण्यासाठी आटापीटा केला जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पुरवठा अधिकाऱ्यांच्या कारभारा विरोधात निवेदन देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये सदर दुकानदार हजर होता. मात्र परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठविल्याचे समजातच त्याने अधिकाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केला आहे. जिल्हयात अधिकाऱ्यांच्या कारभारावरून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमध्येच फुट पडणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply