[ad_1]
हिंगोली शहरात गोळीबारात मयत झालेल्या माय लेकावर मंगळवारी ता. ३१ रात्री त्यांच्या मुळगावी वाई (ता. कळमनुरी) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
.
वसमत शहर पोलिस ठाण्यातील शस्त्रागाराचा सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याने ता. २५ डिसेंबर रोजी रात्री हिंगोली येथे येथून त्याची पत्नी मयुरी, सासू वंदना धनवे व मेहुणा योगेश धनवे यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेमध्ये मयुरी मुकाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वंदना व योगेश हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते.
दरम्यान, नांदेड येथे योगेश याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या शरीरातून तीन गोळ्या आरपार गेल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरही त्याची प्रकृती गंभीरच होती. त्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तर त्याची आई वंदना धनवे यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत नव्हती. मात्र दोघांचे प्राण वाचविण्यासाठी नांदेडच्या शासकिय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या वंदना व त्यांचा मुलगा योगेश यांचा मृत्यू झाला. एकाच वेळी धनवे कुटुंबातील दोन्ही सदस्य मयत झाल्यामुळे वाई गावावर शोककळा पसरली आहे. दोघांच्याही मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी ता. ३१ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वंदना धनवे व योगेश धनवे या माय लेकावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वाई येथील गावकरी अद्यापही धक्कयातून सावरलेच नाहीत.
[ad_2]
Source link
Leave a Reply