अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या १५ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्या
.
अल्पसंख्याक घटकासाठी आर्थिक विकास आणि कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी करीत कमवा आणि शिका योजना, गरीब नवाज रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास निधी कर्ज योजना, प्रधानमंत्री आवास योजनाचा अशा प्रकारच्या योजनांचा लाभ लाभार्थींना ठरावीक वेळेत देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी दिले.बैठकिला जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग उपस्थित होते.
शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक विकासासाठी योजना मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप योजना, बेगम हजरत महल राष्ट्रीय स्कॉलरशीप, नया सवेरा- मोफत शिक्षण योजना राबवल्या जात असून त्या अल्पसंख्याक घटकातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन प्रयत्नशील असून सर्व जिल्ह्यात जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्याचे आयोगाच्या विचाराधीन आहे.
Leave a Reply