[ad_1]
मराठवाड्यातील लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची स्थावर व जंगम मालमत
.
सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी ठेवीदारांना 12 ते 14 टक्क्यांच्या आकर्षक व्याजदाराचे आमिष दाखवले होते. त्यानुसार त्यांनी 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून 2470 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली होती. त्यानंतर या ठेवींचा अपहार करत ही रक्कम कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जाच्या स्वरुपात वाटप करण्यात आली होती.
ईडीच्या तपासात कुटे ग्रुपने या रकमेचा गैरवापर केला व अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कुटे व ज्ञानराधाचे व्हाइस चेअरमन यशवंत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एमपीआयडी कायद्यांतर्गत मे ते जुलै 2024 या कालावधीत विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेल्या या प्रकरणामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी ईडीचा तपास अद्याप सुरू आहे. ईडीने 9 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या पत्रकात या कारवाईची माहिती दिली.
उल्लेखनीय बाब म्हणजे ED ने यापूर्वी ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी बीड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुण्यातील शाखांमधून तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त केली होती. ज्ञानराधा मल्टिस्टेटकडून मिळालेल्या पैशांचा वापर चेअरमन कुटे व पत्नी अर्चना यांनी स्वत:च्या वैयक्तिक फायद्यांसाठी केला आहे. या पैशांतून कुटे दांपत्याने कुटे ग्रुपच्या नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि वैयक्तिक खर्च केला.
राज्याबाहेरही जाळे असण्याची शक्यता
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही जाळे पसरले आहे. गत वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या बीड, छत्रपती संभाजी नगर, पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने बीड, छत्रपती संभाजी नगर, पुणे व मुंबई या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुठे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने आजपर्यंत जप्त केलेली मालमत्ता
24 सप्टेंबर 2024 | 85 कोटी 88 लाख रुपये |
9 ऑक्टोबर 2024 | 1 हजार 2 कोटी 79 लाख |
5 नोव्हेंबर 2024 | 333 कोटी 82 लाख रुपये |
एकूण मालमत्ता | 1 हजार 433 कोटी 48 लाख (अंदाजे) |
[ad_2]
Source link
Leave a Reply