[ad_1]
औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी पोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टॅक्टरसह एक यंत्र असा 11.67 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर शनिवारी ता. 11 औंढा नागनाथ पोलिस ठाण्
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी पोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा केल्या जात आहे. विशेष म्हणजे वाळू तस्कर रात्रीच्या वे्ळी यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करून साठा करून ठेवत असून त्यानंतर त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलिस अधिक्षकर श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार भुजंग कोकरे, भिल्ला वाघ, विजय पडवळ, मुरलीधर ठाकरे, संदीप टाक यांच्या पथकाने शुक्रवारी ता. 10 सायंकाळी पूर्णा नदीच्या पात्रात पाहणी केली. यावेळी एका यंत्राच्या सहाय्याने नदी पात्रातून वाळू काढली जात होती तर वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तेथे उभे करून ठेवलेले दिसले.
पावणे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या पथकाने दोन्ही ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारे यंत्र, सुमारे दोन ब्रास वाळू असा 11.67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार भुजंग कोकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नवनाथ डोंबे, नवनाथ गारकर (रा. अनखोळी पोटा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संदीप टाक पुढील तपास करीत आहेत.
[ad_2]
Source link
Leave a Reply