​​​​​​​मविआ तोडण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी: आंबेडकरांचा आरोप; त्यांना जायचेच असेल तर आम्ही थांबवणारे कोण? -आव्हाड – Mumbai News

[ad_1]

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उपरोक्त आरोप केला आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे या मुद्यावरून आणखीनच राळ उठण्याची शक्यता आहे.

आम्ही त्यांना थांबवणारे कोण? – आव्हाड

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे निशाण साधला आहे. ठाकरे गटाचे स्वबळावर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना आम्ही थांबवणारे कोण? पण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने एकजूट राहण्याची गरज होती असे मला वाटते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घाईघाईने घेतल्याचे वाटत आहे. ग्राउंडवर कार्यकर्त्यांचे मत काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असे मला वाटत नाही. शेवटी जबरदस्तीने कुणाला सोबत घेऊन जाणे आम्हाला पटणारे नाही, असे आव्हाड यांनी या प्रकरणी म्हटले आहे.

आता पाहू काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी शनिवारी सकाळीच ठाकरे गटाची मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला स्वतःला आजमावायचे आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत.

आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत राहून कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात.

ठाकरे गटाच्या बैठकीत स्वबळाचा आळवण्यात आला होता सूर

उल्लेखनीय बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांत सातत्याने खटके उडत आहेत. त्यातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटानेही मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी स्वबळ आजमावण्याचा सूर आळवला होता. त्यानुसार आता ठाकरे गटाने थेट स्वबळाचा नारा दिला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *