[ad_1]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयाने दोन दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली आहे. सीआयडीच्या वतीने विष्णू काटेला 14 दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. विष्णू चाटे हा संघटित गुन्हे
.
विष्णू चाटे याला शुक्रवारी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. मात्र, विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीने रीतसर अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सुनावणीकरिता आज त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांकडून विष्णू चाटेच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. विष्णू चाटे हा संघटित गुन्हेगारीचा भाग असून त्याच्या आणखी चौकशीसाठी कोठडी द्यावी, असे सरकारी वकील म्हणाले होते. ही मागणी न्यायालयार केली असून विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता चौकशीला आणखी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विष्णू चाटेला शुक्रवारी सुनावली न्यायालयीन कोठडी दरम्यान, विष्णू चाटेवर खंडणीसह खुनाचाही गुन्हा दाखल झाला आहे. खुनाचा तपास एसआयटीकडून केला जात आहे, तर सीआयडीकडून खंडणीचा तपास सुरू आहे. यात खंडणी प्रकरणी तपास संपला, असे सीआयडीने शुक्रवारी कोर्टात म्हटले. शुक्रवारी विष्णू चाटेला केज कोर्टात हजर करण्यात केले असता, केवळ सात मिनिटांत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला व कोर्टाने विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, संतोश देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मीक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मीक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्यावर संतोष देशमुख प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नसल्यामुळे त्याच्यावर मोक्का लावलेला नाही.
हे ही वाचा…
बीड हत्याकांडातील सर्व आरोपींवर मकोका:हत्येच्या प्रकरणात SIT ची कारवाई; धनंजय मुंडेंचे विश्वासू वाल्मीक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची माहिती लवकरच कोर्टाला दिली जाणार आहे. सविस्तर वाचा…
[ad_2]
Source link
Leave a Reply