परिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना आणलं एकत्र, मनोज जरांगे सोशल इंजिनिअरींग यशस्वी होणार का?

[ad_1]

Manoj Jarange Social Engineering:  मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा उमेदवार देण्याची घोषणा केलीय. निवडणुकीत मराठा मतांच्या साथीला दलित आणि मुस्लीम मतांची मोट बांधण्याची रणनिती मनोज जरांगे पाटलांनी आखलीय. जरांगेंनी अंतरवालीतून सोशल इंजिनिअरिंगचा एम-एम-डी फॉर्म्यूला ठरवलाय. राज्यात परिवर्तनासाठी मराठा, मुस्लीम आणि दलितांना एकत्र आणल्याचं जाहीर केलंय.

3 नोव्हेंबरला होणार जाहीर

मराठा, मुस्लीम आणि दलित समाजाचे नेते एकत्र आले असले तरी कोणते मतदारसंघ आणि उमेदवार कोण असणार.. हे येत्या 3 नोव्हेंबरला जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय..

‘कुणीही मागे हटायच नाही’

समाजावर कितीही दादागिरी झाली तरीही कुणीही मागे हटायच नाही, यापुढे मराठ्यांनी आझाद म्हणूनच जगायचं असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. मराठा, मुस्लिम आणि दलित समाजानं बांधलेली मोट ही महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार, असा विश्वास मुस्लिम धर्मगुरूंनी व्यक्त केला..

सोशल इंजिनिअरींग कितपत यशस्वी?

महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी सर्व समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र आलोत. आणि या लढाईचं नेतृत्व हे मनोज जरांगेंच्या हाती दिल्याची घोषणा आनंदराज आंबेडकर यांनी केली. राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू झालेल्या अंतरवाली सराटीमधील मनोज जरांगे पाटलांचं हे सोशल इंजिनिअरींग कितपत यशस्वी होत. हे निवडणुकीच्या निकालानंतर कळणार आहे.

जरांगेचा पाठिंबा घेण्यासाठी राजकीय पक्षांची धावाधाव

मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि त्याची सर्वच पक्षांनी धास्ती घेतली होती,  मात्र निवडणूक कुणा एका जातीच्या भरोशावर लढता येणार नाही कुठेतरी तडजोड करावी लागेल हे जरांगे यांचा वाक्य राजकीय पक्षांच्या आशा प्रफुल्लित करणार ठरल आहे आणि त्यानंतर जरागे यांच्याकडे भेटीचा ओघ ही वाढला आहे.. खास करून शिंदेसनेकडून तर भेटींचं सत्रच सुरू आहे असं म्हणावं लागेल गेल्या महिन्याभरात उदय सामंत किमान चार वेळा जरांगे यांना भेटले आणि आता आचारसंहितेतही भल्या पहाटे जरांगे यांची भेट घेतली , माझा मित्र आहे म्हणून भेटायला आलो होतो विचारपूस करायला आलो होतो राजकीय नाही असे ते सांगताय, तर दुसरीकडे  आम्ही पक्ष म्हणून आमची भूमिका जरांगे यांच्या कडे मांडतो आणि त्यांनी पाठिंबा दिला तर तो कुणाला नकोय असं संजय शिरसाठ म्हणाले त्यामुळे दोन्ही नेत्यांची ही वेगवेगळी वाक्य काहीतरी शिजतय आहे हे सांगायला पुरेशी आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *