[ad_1]
मुंबई, 19 जुलै : ठाणे ते डोंबिवली हा प्रवास अवघ्या 20 मिनिटात करता येणार आहे. दरम्यान पुलाचे काम शेवटच्या टप्प्य़ात असून अलीकडेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. माणकोली (भिवंडी) ते मोठा गाव (डोंबिवली) या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. हा पुल उल्हास खाडीवर बांधण्यात आला असून यामुळे ठाणे ते डोंबिवली हा प्रवास सुकर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन महिन्यात हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. ठाण्याहून डोंबिवलीला बायरोड जाताना उल्हास नदी ओलांडण्यासाठी सध्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ला पुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरुन राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुर्गाडी ते कल्याण पूर्वेकडून फिरून यावे लागते. त्यामुळे डोंबिवली ते ठाणेपर्यतचा प्रवास दीड तासांपर्यंत पोहोचत होता. मात्र नव्या पुलामुळे हा प्रवास 20 ते 30 मिनिटांपर्यंत शक्य होणार आहे.
Mhatara Paus: उद्यापासून म्हातारा पाऊस! पुष्य नक्षत्र आणि वाहन बेडूक; पंचागानुसार असा राहील पाऊसकाळ
दरम्यान राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान खेडमधील जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शहरातील सफा मशीद चौकात शिरलेय. एवढंच नाही तर खेडच्या मटण मच्छी मार्केटचा संपर्क देखील तुटला आहे. नदीकाठच्या व खाडीपट्ट्यातील अनेक गावांचे रस्ते पाण्याखाली गेले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply