भारतीय शूटरच्या मदतीने मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार, धमकीचा मेसेज

[ad_1]

मुंबई 19 जुलै : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला. यामध्ये पुन्हा एकदा मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला. या धमकीच्या संदेशानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Seema Haider : सीमा हैदरच्या पाकिस्तानी आयडीमध्ये आणखी खळबळजनक माहिती, एटीएसचा संशय वाढला
या धमकीच्या मेसेजमध्ये मुंबईमध्ये हल्ला करण्यासोबतच योगी आणि मोदी यांनाही लक्ष्य करणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे. वरळी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात 12 जुलैला हा मेसेज आला होता. हा मेसेज सायंकाळी साडेचारच्या सुमारास आला असून तो आखाती देशातून आल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या मेसेज प्रकरणामागे मध्य प्रदेशातील एक तरुण असल्याचा संशय आहे. तो कामानिमित्त सध्या आखाती देशात आहे. हे मेसेज तोच पाठवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र तो आखाती देशात असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण जात आहे. भारतात सगळीकडेच तो अशा प्रकारचे मेसेज करतो, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत असून पोलीस या तरुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या चौकशीनंतर अशा धमकीच्या प्रकरणांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *