दूध पोहचवायला गेला अन् लिफ्टच्या खड्ड्यात पडला, तब्बल 13 तासांनी लागला तपास

[ad_1]

अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 18 जुलै : मुंबईत महिन्याभरापूर्वी एका गृहनिर्माण संस्थेतील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रुद्र बर्‍हाटे असं मृत मुलाचे नाव असून त्यांच्या मृत्यूच्या महिन्याभरातनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी लिफ्ट कंत्राटदार आणि तंत्रज्ञ यांच्यासह गृहनिर्माण सोसायटी समितीचे सचिव, समिती सदस्य आणि खजिनदार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. ही घटना ताजी असतानाच आज अशीच एक घटना घडली. दूध पोहचवायला आलेल्या एका व्यक्तीचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. काय आहे घटना? मुंब्रा येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास जटाशंकर बलजूर पाल (वय 45 वर्षे, रा. मुंब्रा) हा अनमोल अपार्टमेंट, अल्मास कॉलनी कौसा मुंब्रा या इमारतीमध्ये दुधाची डिलिव्हरी करण्याकरता गेला असताना लिफ्टच्या डकमध्ये (खड्ड्यात) पडून मयत झाला आहे. त्याचा मृतदेह रात्री साडेवाजताचे सुमारास आढळून आले. सदर प्रकरणांमध्ये आकस्मित मृत्यू दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. एक महिन्यानंतर गुन्हा दाखल मुंबईत एका गृहनिर्माण संस्थेतील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना मागील महिन्यात 7 जून रोजी घडली होती. या पाच जणांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘आरोपींच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे पुरावे मिळविण्यासाठी आम्ही चौकशी करत असल्याने एफआयआर नोंदवायला आम्हाला एक महिना लागला .” वाचा –
3 महिन्यातच मोडली सुखी संसाराची स्वप्नं; प्रेमविवाहानंतर तरुणीची आत्महत्या
याप्रकरणी रुद्रची आई प्रियांका बर्‍हाटे यांनी फिर्याद दिली आहे की, त्या लल्लूभाई कंपाऊंडमधील सुप्रभात हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर पती, चार मुले आणि मेव्हणा प्रशांतसोबत राहत होत्या. रहिवाशांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनेकदा लिफ्टच्या नादुरुस्तीची तक्रार करूनही या प्रकरणी गृहनिर्माण संस्थेने कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *