[ad_1]
मुंबई, 17 जुलै : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपानंतर होणाऱ्या या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदार वायबी चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले. याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही आमदारांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीसाठी एकूण ३२ आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानतंर अजित पवार यांच्यासोबतचे सर्व आमदार अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंत चव्हाण सेंटरवर पोहोचले. रविवारीसुद्धा अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पुन्हा आजही शरद पवार यांच्या भेटीला आमदार गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय अशी चर्चा रंगली आहे.
अजितदादा समर्थक आमदार का गेले शरद पवारांच्या भेटीला? दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं कारण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शऱद पवार गट अशी फूट पडली आहे. पण अद्यापही कोणाच्या बाजुने किती आमदार हे गुलदस्त्यात आहेत. अजित पवार यांच्या गटातले आमदार शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीतही दिसतात तर पुन्हा अजित पवार यांच्यासोबतही दिसतात. त्यातच आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सर्व आमदार वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले आहेत. रविवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे आदी नेते गेले होते. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशीर्वाद मागितला. राष्ट्रवादी एकसंघ राहू शकते असा प्रयत्न करावा अशी विनंती त्यांना केली. मात्र शरद पवार यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही असंही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply