निलम गोऱ्हेंच्या अडचणीत वाढ; ‘मविआ’च्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट

[ad_1]

मुंबई, 17 जुलै : काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होतना दिसत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआच्या शिष्टमंडळानं राज्यापालांची भेट घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी मविआच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवश आहे. पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाकडून आज राज्यापालांची देखील भेट घेण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये 40 आमदारांचा समावेश होता. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही राज्यापालांकडे यावेळी केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, विधान परिषदेचे उपसभापती यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून न्याय देऊ शकत नाहीत, त्यामुळे राज्यापालांनी आता या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही यावेळी केल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *