[ad_1]
मुंबई, 17 जुलै : काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. नीलम गोऱ्हे यांच्यापूर्वी मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. कांयदे यांनी पक्षात प्रवेश करताच शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करावं अशी मागणी ठकरे गटाकडून करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करत ठाकरे गटाकडून विधानभवन सचिवांना पत्र देण्यात आलं आहे. आता या पत्राला पुढील चौदा दिवसांच्या आता गोऱ्हे आणि कायंदे यांना उत्तर द्यावं लागणार आहे.
पहिला दिवस वादळी आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आज विधान भवनाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार सहभागी न झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply