मुलं फोटो काढत असतानाच डोळ्यादेखत आई समुद्रात वाहून गेली; मुंबईतील घटनेचा VIDEO

[ad_1]

मुंबई 16 जुलै : मुंबईतील वांद्रे येथे समुद्रकिनारी फिरायला जाणं एका कुटुंबाला भलतंच महागात पडलं. मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवळ रविवारी संध्याकाळी ज्योती सोनार नावाची महिला तिच्या कुटुंबासह गेली होती. यावेळी ती समुद्राच्या लाटेत वाहून गेली. पती मुकेश आणि त्यांची तीन मुलं ही दुर्दैवी घटना पाहत होती. मिड-डेच्या वृत्तानुसार, रबाळेच्या गौतम नगरमध्ये राहणारा मुकेश या घटनेबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. जेव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो. मी माझ्या पत्नीची साडी पकडली आणि जवळच्या एका पर्यटकाने माझा पाय मागून पकडला, पण तिला वाचवता आलं नाही. मुकेशने सांगितलं की, त्यांचं कुटुंब दोन आठवड्यातून एकदा सहलीला जायचं.

मुकेशने सोनार म्हणाले की, ‘त्या दुर्दैवी रविवारी आम्ही जुहू चौपाटीवर जाण्याचं ठरवलं होतं. मात्र, भरती-ओहोटीमुळे आम्हाला समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आम्ही वांद्रे येथे जाण्याचा बेत केला. तिथे आम्ही वांद्रे किल्ल्याजवळ पोहोचलो. वांद्रे किल्ल्याजवळ पोहोचल्यानंतर आम्ही फोटो क्लिक केले. फोटो काढण्यासाठी हे कुटुंब समुद्राजवळ गेलं होतं. मुकेश म्हणाला, ‘ज्योती माझ्या पाठोपाठ समुद्रात आली आणि आम्ही आमच्या कपड्यांवर उडणाऱ्या पाण्याच्या शिंतोड्यांचा आनंद घेऊ लागलो.
Viral News: 25 वर्षीय तरुणाने खाल्ले 150 मोमोज; काहीच वेळात चक्कर येऊन पडला अन् पुन्हा उठलाच नाही
पुढे ते म्हणाले, मुलंही आमच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होती, पण लाटा जास्त असल्याने आम्ही त्यांना थांबवलं. आम्ही एका खडकावर बसलो आणि आमची मुलं, आम्हाला दुरून पाहत होती. त्यांनी आमचे फोटो काढायला सुरुवात केली.’ तेव्हाच ही दुःखद घटना घडली. मुकेश पुढे म्हणाला, ‘माझी पकड मजबूत होती, ती तिच्या साडीमुळे घसरली आणि माझ्या डोळ्यांसमोर समुद्रात ओढली गेली. माझी मुलं तिथे होती. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र कोणीही काही करू शकलं नाही. या धक्क्यातून ते कसे सावरतील माहीत नाही. आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी ही घटना पाहिली आणि लगेच पोलिसांना कळवलं. मुंबई अग्निशमन दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *