धबधब्यात गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू, तिघेही अवघ्या 18-19 वर्षे वयाचे

[ad_1]

राजा मयाळ, ठाणे, 14 जुलै : राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा असली तरी काही ठिकाणी मुसळधार पाऊस गेल्या दोन आठवड्यात झाला आहे. यामुळे पावसाळी पर्यटन सुरू झाले आहे. धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान, पावसाळ्यात काही ठिकाणे धोकादायक बनली असून अशा ठिकाणी पोलिसांनी बंदीही घातली आहे. दरम्यान, वसईत काल एका दिवसात धबधबा बघायला गेलेले तिघे बेपत्ता झाले होते. त्या तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. वसई विरारच्या समुद्र किनाऱ्यावर तुंगारेश्वर आणि चिंचोटी इथं ही घटना घडली आहे. यात मृत्यू झालेल्या तरुणांचे वय अवघे 18 ते 19 वर्षे इतके आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी मुंबईच्या विलेपार्ले आणि नालासोपारा येथून दोन वेगवेगळे ग्रुप फिरायला आले होते. ह्यातून विलेपार्ले येथे राहणारा सुमित राधेश्याम यादव हा आपल्या 4 मित्रांसोबत तुंगारेशवर येथून तसेच नालासोपारा येथील राहणारे रवी झा आणि रोशन राठोड चिंचोटी येथून बेपत्ता झाले होते. ही घटनांची माहिती मिळताच नायगांव पोलीस तसेच तिथले अग्निशमन दलाच्या जवानांनी बेपत्ता मुलांचा शोध घेतला.
सगळीकडे पाणीच पाणी, दररोज ‘मृत्यू’वर पाय ठेवून जातात शाळेत विद्यार्थी, कधी होणार सुटका?
दरम्यान, मुंबईच्या विलेपार्ले येथील राहणारा 18 वर्षीय सुमित राधेश्याम यादव या मुलाच मृत्यू झाला होता. तर काल गुरुवारी नालासापोरातील 18 वर्षीय रोशन राठोड आणि 19 वर्षीय रवी झा या दोघां युवकांचा ही मृत्यू झाला होता. या दोघांचा मृतदेह आज दुपारी चार वाजता मिळाला आहे. दोघे ही नालासोपारा अल्कापूरी येथील राहणारे आहेत. मुंबईच्या विलेपार्ले येथे राहणारा सुमित यादव आपल्या चार मित्रांसोबत वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील धबधब्यावर फिरायला गेला होता. दरम्यान, धबधब्याखाली असलेल्या नदीत तो पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नदीचे पात्र खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *