ठाणे : सगळीकडे पाणीच पाणी, दररोज ‘मृत्यू’वर पाय ठेवून जातात शाळेत विद्यार्थी

[ad_1]

तुषार शेटे, प्रतिनिधी ठाणे, 14 जुलै : ठाणे जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका अशी शहापूर तालुक्याची ओळख आहे. मुंबई नाशिक या मेट्रोसिटींचा मध्यवर्ती तालुका जरी असला तरीही विकासापासून हा तालुका अद्यापही दूरच आहे. निसर्गसंपन्नतेने हा तालुका नटलेला जरी असला तरीही या तालुक्याला एक शाप लागलाय. हा शाप हा दारिद्रतेचा, मागासलेपणाचा. आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी या तालुक्याचं, मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न केला पण दुर्देवाने इथले प्रश्न अद्यापही सुटले नाही. अद्यापही या आदिवासी पाड्याने वीज पाहिली नाही. अनेक वर्षानंतरही इथल्या समस्या आजही कायम आहेत. माहुली किल्ल्याच्या जवळ पिवळी ग्रामपंचायतीमध्ये छोटासा आदिवासी पाडा आहे. रताळे पाडा. या पाड्यात 19 घरं असून जवळपास प्रत्येक घरातलं मूल शाळेत जातं. रताळेपाड्यात 1 ते 4 थी पर्यंतची शाळा भरते तर पिवळी पाड्यावर 5 ते 12 पर्यंतचे वर्ग भरतात. मात्र पावसाळ्यात विद्यार्थ्यांचं अनेकदा नुकसान होतं. कारण या दोन्ही पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता नाही. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना लाकडी साकवावारून शाळेत जावं लागतं. यापूर्वी 2 वेळा हा साकव वाहूनही गेला होता. मात्र, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी स्वत:च श्रमदानातून साकव तयार केला. मात्र जेव्हा जोरदार पाऊस होतो. तेव्हा विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. जास्तच जोरदार पाऊस झाला तर साकव पाण्याखाली बुडून जातो आणि विद्यार्थ्याची शाळा बुडते.

शहापूर तालुक्यात गुरूवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने इथल्या पाड्यांमधले ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशात आपली शाळा चुकू नये म्हणून विद्यार्थी शाळेत जायला निघाले. मात्र साकवाजवळ येताच त्यांच्या काळजात धस्स झालं. शाळेत जायच्या वेळी पाणी जास्त जरी नसलं तरीही परत येताना जास्त पासून झाला तर विद्यार्थ्यांना अडकून पडावं लागलं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
(Jalgaon News : जळगावातील ग्रामस्थांची कौतुकास्पद कामगिरी, 5 एकरात केली वृक्षांची लागवड)
या भागात आणखी किती दिवस पाऊस असाच राहील आणि विद्यार्थ्यांची शाळा किती दिवस बुडेल या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी विद्यार्थ्यांकडे नाहीये. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या, नेत्यांनी राज्यकर्त्यांनी या पाड्यांमध्ये किमान सोयी सुविधा पुरवण्यास प्राधान्य द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आहे. त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेनी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकदा इथल्या भागात सोयी सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे शिंदे पितापुत्रांनी  या आदिवासी विद्यार्थ्यांना एक छोटा पूल बांधून देऊन त्यांच्या शिक्षणातला अडसर दूर करावा अशी माफक अपेक्षा इथल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *