[ad_1]
मुंबई, 14 जुलै, अजित मांढरे : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. जी दूध डेअरी गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर आता कारवाई होणार आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. या समितीच्या अहवालामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. काय आहे समितीचा अहवाल? राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता कमीत कमी 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी दर देणाऱ्या दूध डेअऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जालन्याच्या CEOचा पालकांसमोर आदर्श, स्वत:च्या मुलाला दिला दरेगावच्या अंगणवाडीत प्रवेश
दूध उत्पादनाला चालना मिळण्याची शक्यता राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन करतात. मात्र अनेकदा दूधाला चांगला दर मिळत नसल्यानं त्यांना मोठा फटका बसतो. मात्र आता दरनिश्चिती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply