[ad_1]
मुंबई, १४ जुलै : कोणताही गुन्हा घडण्यामागे काही विशिष्ट कारण असतं; पण काळानुरूप गुन्ह्यांमागची काही कारणं बदलताना दिसत आहेत. तरुणाईमध्ये महागड्या आयफोनचं आकर्षण खूप जास्त आहे. हाच आयफोन आता गुन्ह्यांसाठी कारणीभूत ठरू लागला आहे. मुंबईत अशा प्रकारचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. एका तरुणाने आयफोनसाठी गुन्हेगारी कृत्य केलं आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हा गुन्हा नेमका काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया. 26 वर्षांच्या एका तरुणाने आयफोनच्या मोहापायी त्याच्या 19 वर्षांच्या एक्स-गर्लफ्रेंडचं अपहरण केलं. त्यानंतर या मुलीला सोडण्यासाठी तिच्या आईकडे आयफोन किंवा दीड लाख रुपये देण्याची मागणी केली; पण या तरुणाचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने बुधवारी (12 जुलै) गोल्डन नेक्स्ट परिसरातून एका किशोरवयीन मुलाचे अपहरण केलं आणि तिच्या मोबाइलवरून तिच्या आईला फोन करून खंडणी म्हणून आयफोन किंवा रोख दीड लाख रुपये देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही गोष्टींचा खुलासा झाला. तपासादरम्यान असं दिसून आलं, आरोपी आणि पीडित महिलेची जानेवारीत भेट झाली होती आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं; मात्र संबंधित व्यक्ती आधीच विवाहित असल्याचं समजल्यावर पीडित महिलेने त्याला भेटणं बंद केलं होतं. यावरून संतापलेल्या या व्यक्तीने काही खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला भेटण्यास भाग पाडलं. यामुळे घाबरून ती त्याला एक ते दोन वेळा भेटली असं समोर आलं आहे.
झोपलेल्या तरुणीवर फेकलं अॅसिड, लग्न मोडल्याने नाराज होता तरुण, संतापजनक घटना
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झाल्याचं समजताच या मुलीच्या आईने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अपहरणकर्त्या व्यक्तीला या महिलेच्या फोनवरून कॉल केला. त्याने तो उचलला. समोर कोण बोलतंय हे जाणून न घेता त्याने आपली मागणी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली. जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या मागणीला प्रतिसाद दिला तेव्हा तो घाबरला आणि या किशोरवयीन मुलीला एकटं सोडून पळून गेला. `बुधवारी आरोपीने तीच धमकी देऊन पुन्हा तिला भेटण्यास सांगितलं,` असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. `आम्ही त्या व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे,` अशी माहिती एबीव्हीव्ही पोलीस झोन 1 चे डीसीपी जयंत बजबळे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply