[ad_1]
मुंबई, 14 जुलै : राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणात अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले होते. मात्र अपात्र आमदारांबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात दोन आठवड्याच्या आत उत्तर सादर करावे असे आदेश या नोटीसद्वारे सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. नार्वेकरांची प्रतिक्रिया दरम्यान या नोटीसबाबत विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. नोटीस मिळाली की अभ्यास करून उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्याच्या आत आपलं उत्तर सादर करावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांना ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी याचिका ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसेच तो निश्चित कालावधीमध्ये घेणं अपेक्षीत असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. मात्र आता सुनावणीस विलंब होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाकडून आता विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन आठवड्याच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply