[ad_1]
मुंबई, 14 जुलै : मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांची संभाव्य यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे अजित पवार यांना अर्थमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते नको असा सूर शिवसेनेतून उमटत होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर या प्रकरणावर तोडगा निघाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनाच अर्थमंत्रिपद मिळणार आहे. तर छगन भुजबळ यांच्याकडे कृषीमंत्रिपदाचा कारभार सोपावला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचं सभांव्य खातेवाटप अर्थ – अजित पवार कृषी- छगन भुजबळ सहकार- दिलीप वळसे पाटील परिवहन- धर्मराव अत्राम सामाजिक न्याय – धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा – अनिल भाईदास पाटील महिला बाल कल्याण – अदिती तटकरे क्रीडा – संजय बनसोडे अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ दरम्यान अजित पवार यांना अर्थमंत्रिपद मिळणार आहे, मात्र त्याबदल्यात अजित पवार यांना काही महत्त्वाची खाती शिवसेनेसाठी सोडवी लागणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला अधिकची खाती जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link
Leave a Reply