आंतरराष्ट्रीय टोळीविरोधातील युद्ध जग हरण्याच्या स्थितीत…: मोबाइल ॲप, क्रिप्टो चलनास प्रोत्साहन, हत्येसारखे गुन्हे कमी झाले, मात्र सायबर गुन्हे वाढले

[ad_1]

  • Marathi News
  • International
  • As The World Loses The War On International Gangs…, Mobile Apps, Cryptocurrency Boosts, Crimes Like Murders Drop, But Cybercrime Rises

न्यूयॉर्क4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकीकडे जग रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धाशी झगडत आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय गँगस्टर आणि संघटित गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. ते सध्याच्या स्थितीचा फायदा उचलत जगात ठिकठिकाणी आपला विस्तार करत आहेत. १० वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना इंटरपोलच्या सरचिटणीस पदावर राहिलेले जर्गेन स्टॉक यांच्यानुसार, जग गुंड टोळ्या आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध लढाई हरत आहे, ही मला भीती आहे. त्यांच्या तर्कानुसार, संघटित गुन्हेगारांच्या नेटवर्कमध्ये अभूतपूर्व विस्तार पाहायला मिळाला आहे.

जगभरात संघटित गुन्ह्यावर लक्ष ठेवणारी संस्था ट्रान्सेशनल ऑर्गनाइज्ड क्राइमचे ग्लोबल इनिशिएटिव्हचे संचालक मार्क शॉ म्हणतात, इंटरनॅशनल गँगाच्या विस्ताराची ३ प्रमुख कारणे आहेत. एन्क्रिप्टेड ॲप्स आणि क्रिप्टोकरन्सीसारख्या तंत्रज्ञानाने गुन्हेगारांना एकमेकांशी जोडणे आणि आपली कमाई जगभरात अशा पद्धतीने हस्तांतरीत करण्याची अशी सुविधा दिली आहे.याशिवाय सिंथेटिक ड्रर्जमुळे जागतिक टोळ्यांची मोठी कमाई होत आहे.

या शतकाच्या पहिल्या २० वर्षांत जगातील हत्येचे प्रमाण एक चतुर्थांशने कमी झाले. हे १ लाख लोकांमागे ६.९ वरून घटून ५.२ झाले आहे. मात्र, सायबर गुन्हे वाढले आहेत. चेनॉालिसिस या डेटा कंपनीचा अंदाज आहे की २०२३ पर्यंत रॅन्समवेअर हल्ल्यांमधून बेकायदेशीर कमाई ७.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. ही रक्कम गुन्हेगारी टोळी आणि उत्तर कोरियाच्या १० हजार हॅकर्समध्ये वाटली जाईल.

सिंथेटिक ड्रग्जची टोळी ग्लोबल, नवनवे ड्रग्ज येताहेत

सिंथेटिक ड्रग्जमुळे टोळीचा झपाट्याने विस्तार झाला. २०१३ व २०२२ दरम्यान दक्षिण-पूर्व आशियामध्ये मेथॅम्फेटामाइनची जप्ती चौपट वाढली. २०१० ते २०२० दरम्यान ड्रग्ज घेणारे लोक एक पंचमांश वाढले. नवीन सिंथेटिक ड्रग्ज जास्त शक्तिशाली आहेत. उदा., फेंटॅनाइल हेरॉइनपेक्षा ५० पट अधिक शक्तिशाली व इटोनिटाझिन हेरॉइनपेक्षा ५०० पट अधिक शक्तिशाली आहे.

ग्लोबल गँग : ४० देशांत नेटवर्क, ६० हजार सदस्य

इटलीच्या कॅलाब्रियाचा माफिया अँन्ड्रागेटाच्या दीर्घकाळापासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम युराेपमयध्ये शाखा आहेत. अँन्ड्रागेटाचे नेटवर्क ४० देशांत विस्तारले असून त्याची वार्षिक उलाढाल ५० अब्ज डॉलर आहे.

ब्राझीलची सर्वात मोठी टोळी फर्स्ट कॅपिटल कमांड, गुन्हेगारी बाजाराच्या नियामक संस्थेच्या रूपात कार्य करते. साओ पाऊलो युनिव्हर्सिटीचे ब्रुनो पेस मानसो म्हणाले, ही टोळी संघर्ष कमी करण्यासाठी नियम स्थापन करते. २६ देशांत ६० हजार सदस्य आहेत.

अल्बानियाची गुन्हेगारी टोळी ही ग्लोबल झाली आहे. जगातील २ सर्वात मोठे कोकेन उत्पादक देश कोलंबिया व पेरूशिवाय इक्वेडोरचा अंडर वर्ल्डही अल्बानियन गँगस्टर्स सोबत आहे.

कोलंबियन बंडखोर टोळी फार्क कोलंबियाच्या ग्वायकिल पोर्टवरून युरोप व अमेरिकेला जाणारे कोकेनची खेप नियंत्रित करत होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *