[ad_1]
भारतात आज असा एकही व्यक्ती नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही. अगदी वृद्ध व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल असतो. मोबाईल जणू काही आपल्या आयुष्यातील एक अविभाज अंग झालाय. अशातच सध्या लोकांच्या फोनवर एक कॉल येतो. ज्यामध्ये सरकारकडून युजर्सचे मोबाईल नंबर ब्लॉक केले जात आहे, असं अनेक मोबाईल यूजर्सना कॉल जात आहेत. जर तुम्हाला असा कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगा. काय आङे या कॉलमागील सत्य आणि नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. (Mobile number block from the government Have you received such a call Know what the truth )
सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक?
सायबर ठग टेलिकॉम रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच ट्रायच्या नावाने लोकांना असे अनेक फोन जात आहेत. हा एक फसवणुकीचा कॉल असल्याचा सांगण्यात आलंय. या कॉलद्वारे यूजर्सला नंबर बंद करण्याची धमकी दिली जातेय.
भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा पीआयबीने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केलंय. लोकांना सावध करत, PIB ने ट्विट केलंय की, ‘तुम्हाला देखील ट्रायकडून कॉल केला जात आहे की फोनच्या असामान्य वर्तनामुळे तुमचा मोबाइल नंबर लवकरच ब्लॉक केला जाईल?’
सरकारच्या दावात किती तथ्य
पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलंय. दूरसंचार नियामक TRAI ग्राहकांना नंबर डिस्कनेक्शनबाबत कॉल किंवा संदेश पाठवत नाही.
क्या आपको भी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण की ओर से कॉल करके यह दावा किया जा रहा है कि फ़ोन के असामान्य व्यवहार के कारण आपका मोबाइल नंबर जल्द ही ब्लॉक कर दिया जाएगा ?#PIBFactCheck
▶️@TRAI के द्वारा ग्राहकों को नंबर डिस्कनेक्ट करने से संबंधित कॉल या मैसेज नहीं भेजा जाता है pic.twitter.com/Yk5Hb5ANpE
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 12, 2024
दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत इथे करा तक्रार
आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारशी संबंधित कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत देखील घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती 8799711259 या WhatsApp क्रमांकावर PIB फॅक्ट चेकला दिशाभूल करणाऱ्या बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकते किंवा factcheck@pib.gov.in वर मेल करू शकते.
[ad_2]
Source link
Leave a Reply