तेल अवीवसह इस्त्रायलमधील १८२ शहरांवर अग्निगोळ्यांचा वर्षाव, हिजबुल्लाहने सलग दुसऱ्या दिवशी रॉकेट हल्ले

[ad_1]

इस्रायल आणि लेबनॉनचा दहशतवादी समूह हिजबुल्लाह यांच्यातील युद्धाला धोकादायक वळण लागले आहे. इस्रायल एकीकडे लेबनॉनमध्ये जमिनी हल्ला करून हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना टिपत असताना  दुसरीकडे हिजबुल्लाहनेही इस्रायलमध्ये दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाहने सलग दुसऱ्या दिवशी इस्रायलवर रॉकेट हल्ला करून आगीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. सोमवारी इस्रायली सैन्याने सांगितले की, हिजबुल्लाहने तेल अवीवसह मध्य इस्रायलमधील सुमारे १८२ शहरांवर रॉकेट हल्ला केला. हवाई हल्ल्यामुळे अनेक शहरात सायरन वाजले आणि सुरक्षिततेच्या भीतीने लोकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *