[ad_1]
इस्लामाबाद11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

शांघाय सहकार्य संघटनेची २३ वी शिखर परिषद मंगळवारी पाकिस्तानात सुरू होत आहे. मात्र, ही परिषद देशांतर्गत राजकारणाचा आखाडा होत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने(पीटीआय) मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, सरकार रस्त्यांवर आंदोलनाची परवानगी देत नसेल तर तुरुंगाच्या आत त्यंाना आंदोलनाची परवानगी दिली जाईल. पक्षाने इस्लामाबादच्या डी-चौकावर मोठे अांदोलन करण्याची घोषणा केली आहे. पीटीआयने हाही इशारा दिला की, इम्रान खान यांना तुरुंगातून त्यांचे कुटुंब, पक्ष नेते, कायदेशीर टीम आणि डॉक्टरांना भेटण्याची परवानगी न दिल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल.
शाहबाज सरकारने इशाऱ्याला प्रत्युत्तर देत सांगितले की, एससीओ शिखर परिषदेदरम्यान पीटीआयने इस्लामाबादमध्ये विरोध केल्यास सरकार संपूर्ण ताकदीने रोखण्याचा प्रयत्न करेल. भारतीय विदेश मंत्री एस.जयशंकर परिषदेसाठी मंगळवारी इस्लामाबादला जातील. त्यांनी पाकसोबतच्या द्वीपक्षीय चर्चेच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.
मुद्दा उचलणार कियांग
शिखर परिषदेसाठी चिनी पंतप्रधान ली कियांग सोमवारी पाकिस्तानला पोहोचले. त्यांच्या अजेंड्यात परिषदेशिवाय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही समाविष्ट आहे. दोन्ही नेते चीन-पाक आर्थिक कॉरिडॉर योजनेत येणाऱ्या अडचणी व योजनांतील चिनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर चर्चा करणार आहेत.
सुरक्षेसाठी १० हजारांपेक्षा जास्त जवान तैनात
एससीओ परिषेच्या सुरक्षेसाठी इस्लामाबादमध्ये १० हजारांहून जास्त पोलिस आणि निमलष्करी दलांची तैनातील केली जाईल. राजधानीची सीमा सील केली आहे आणि शेकडो लोकांना सुरक्षात्मक उपाय म्हणून अटक केली आहे.यासोबत सुरक्षेसाठी १४ ऑक्टोबरला इस्लामाबादला तीन दिवसांची सुटी जाहीर केली आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply