पाक चौक्यांवर तालिबानचा हल्ला; अणुप्रकल्पाचे 16 कामगार अपहृत: अफगाणिस्ताननजीक खैबर पख्तुनख्वात तालिबानचे हल्ले

[ad_1]

  • Marathi News
  • International
  • Taliban Attacks On Pak Outposts; 16 Nuclear Workers Kidnapped, Taliban Attack Near Khyber Pakhtunkhwa, Afghanistan

इस्लामाबाद/लाहौर27 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अफगाणिस्तान सीमेलगत खैबर पख्तुनख्वात पाकिस्तान कोंडीत सापडला आहे. अफगाण तालिबान व तहरीक-ए-तालिबानने(टीटीपी) गुरुवारी पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर रॉकेट व उखळी तोफांनी हल्ला चढवला. मकीन आणि मालीखेलच्या लष्करी चौक्यांवरील हल्ल्यानंतर तालिबानने खैबरच्या लक्की मारवतच्या ऊर्जा प्रकल्पातील १६ कामगारांचे अपहरण केले. सर्व जण रात्रपाळी करून परतत होते. हा प्रकल्प पाक अणुऊर्जा आयोगाअंतर्गत येतो.आयोगानुसार, अपहृत कंत्राटी होते. २४ डिसेंबरला पाक हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पकतिका आणि खोस्त भागात बॉम्ववर्षाव केले होते. यात ४६ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या प्रत्युत्तरात अफगाण तालिबानने टीटीपीसोबत आपल्या १५ सदस्यांना खैबर पख्तुनख्वा सीमेवर पाठवले आहे. दुसरीकडे, लाहोरमध्ये बंदुकीचा धाक दाखवत ३ हिंदूंचे अपहरण

पाकिस्तानच्या पंजाब राज्यात रहीम याार खानमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तीन हिंदू तरुणांच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनुसार, अपहृत तरुण शमन, शामीर आणि साजन आहेत. टोळीचा म्हाेरक्या कोराईने पोलिसांना एक व्हिडिओत घटनेची जबाबदारी स्वीकारत आपल्या १० सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली. कोराईने इशारा दिला की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीन हिंदू तरुणांची हत्या केली जाईल.

तालिबानचा वर्षातील चौथा हल्ला, गेल्या वर्षी २६५ हल्ले केले होते

टीटीपीला पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटना मानते. टीटीपीच्या म्हणण्यानुसार, ईशान्य क्षेत्रात पाकिस्तान सरकारच्या स्थानिक लोकांवरील अत्याचाराविरुद्ध संघर्ष करत आहे. या वर्षातील हा चौथा हल्ला आहे. २०२४ दरम्यान टीटीपीने २६५ हल्ले घडवले. यात पाकिस्तानी लष्करातील ६७ जवानांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये टीटीपीने बाका खेलहून गॅस पाइपलाइनचे ३ कर्मचारी तर नोव्हेंबरमध्ये ७ पोलिसांचे अपहरण केले.

मागणी मान्य करून सुटका करा- अपहृत कामगार

तालिबानने खैबरच्या कबाल खेल भागात कामगारांना उतरवून गाडीला आग लावली. तालिबानने गुरुवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात अपहृत कामगारांनी शाहबाज सरकारला आवाहन केले की, टीटीपीच्या मागण्या मान्य करून त्यांची लवकरात लवकर सुटका करावी. पाकिस्तान लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त टीमने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मात्र, येथील दुर्गम पर्वत आणि गुहांमुळे यश मिळण्याची शक्यता कमी सांगितली जाते. सू़त्रांनुसार, शाहबाज सरकारला सुटकेसाठी टीटीपीसोबत करार करावा लागेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *