अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना’हश मनी’प्रकरणात ना शिक्षा झाली ना त्यांना कोणता दंड ठोठावला गेला. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी त्यांच्यावर कोणत्या अटी-शर्थीही लादल्या नाहीत. ट्रम्प यांना पोर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. शुक्रवारी न्यूयॉर्कच्या न्यायालयाकडून ट्रम्प यांना शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र न्यायालयाने ट्रम्प यांना दिलासा दिल्याने त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Leave a Reply