झोपून महिलेने कमावले 40 लाख; फक्त पाहायची एक स्वप्न; पतीचाही विश्वास बसेना

[ad_1]

प्रिन्स जॉर्ज काउंटीमधील मेरीलँडमधील एका महिला रहिवाशाने अलीकडेच पिक ५ च्या लॉटरी ड्रॉमध्ये 50 हजार डॉलर्सचं (अंदाजे 42.96 लाख) बक्षीस जिंकलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तिने आपल्याला लॉटरी जिंकणारा नंबर स्वप्नात दिसला होता असा दावा केला आहे. स्वप्नात नंबर पाहिल्यानंतर तिने ते तिकीट विकत घेण्याचं ठरवलं आणि नशीबच फळफळलं. 

स्वप्नात आला जिंकणाऱ्या लॉटरीचा अंदाज

भाग्यवान विजेत्याने मेरीलँड लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं की डिसेंबरमध्ये तिला एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम होता. या असामान्य गोष्टीवर कृती करून, तिने ऑक्सन हिल झिप इन मार्टमधून 9-9-0-0-0 क्रमांक वापरून पिक 5 तिकीट खरेदी केली. 

तो क्षण आठवत असताना, तिने जवळजवळ संधी गमावल्याचे कबूल केले. “आम्हाला उशीर झाला होता आणि मी जवळजवळ खेळायला विसरले होते,” असं ती म्हणाली. “पण मला माहित होते की आम्हाला माझ्या स्वप्नातील ते क्रमांक खेळायचे आहेत.” 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी सोडतीत जेव्हा या क्रमांकांनी तिला 50 हजार डॉलर्सचं बक्षीस मिळवून दिलं तेव्हा तिला आपला निर्णय योग्य असल्याचं लक्षात आलं. 

पतीचाही विश्वास बसेना

विजेत्याच्या पतीने बातमी ऐकताच सुरुवातीला शंका व्यक्त केली. “माझ्या पत्नीने मला दाखवलं, पण ते खरं वाटले नाही,” असं त्याने सांगितलं. नशिबाचा विचार करत तो पुढे म्हणाला, “पण सुदैवाने ते सर्व खरं होतं.”

हे जोडपे अजूनही त्यांच्याकडे आलेल्या या संपत्तीचा वापर कसा करायचा यावर विचार करत असताना, पतीने एक विचार मांडला. “तिला जे हवं आहे ते,” असं सांगताना त्याने त्यांच्या नातवंडांना आधीच एक विशेष ख्रिसमस दिला असल्याचं म्हटलं. .



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *