स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत कचऱ्याच्या गाडीत बसले ट्रम्प, बायडेन आणि हॅरिसला म्हणाले लाज वाटू द्या; कारण काय?


रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचार रॅलीदरम्यान कचऱ्याच्या ट्रकमध्ये बसलेले दिसले. यावेळी ट्रम्प यांनी कचरा वेचकांचा ड्रेस परिधान केला होता. खरे तर ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या वक्तव्याला उत्तर देत होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ट्रम्प यांचे सर्व समर्थक कचरा आहेत. ट्रम्प यांनी या विधानाचा वापर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्याविरोधात करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रकमध्ये बसलेल्या पत्रकारांना विचारले, “मला सांगा, तुम्हाला माझा कचऱ्याचा ट्रक कसा वाटतो?” माझा हा ट्रक कमला हॅरिस आणि बायडन यांच्या सन्मानार्थ आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *