मुंबईत T-20 World Cupची विजयी परेड, जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

[ad_1]

2024 टी 20 विश्वचषक जिंकून टीम इंडियाने 11 वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकली. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून रोहित अॅण्ड कंपनी T20 विश्वविजेती बनली. आता मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह खुल्या बसमधून मुंबईचा दौरा करणार आहेत.

टीम इंडिया विशेष विमानानं बार्बाडोस येथून निघाली असून ती आज (4 जुलै) रोजी दिल्लीत पोहोचली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून टीम इंडिया मुंबईला येणार आहे. मुंबईमध्ये विश्वविजेती रोहित अॅण्ड कंपनी ओपन बस राईड करणार असून त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि त्याचे टीमचे 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांचं मुंबईत मोठं स्वागत करण्यात आलं होतं.

भारताची T20 विश्वचषक विजय परेड कधी आणि कुठे होईल?

गुरुवारी (4 जुलै) सायंकाळी 5 वाजता विजयी परेड सुरू होईल. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ही मिरवणूक काढण्यात येईल.

विजय परेडचे प्रसारण कुठे पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनल आणि यूट्यूबवर सकाळी 9 पासून त्याच्या विशेष ‘फॉलो द ब्लूज’ आवृत्तीवर विजय परेडचे थेट प्रक्षेपण करेल. जिओ सिनेमा देखील संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून विजय परेडचे थेट प्रक्षेपण करेल.

दुसऱ्यांदा जिंकलो

मेन इन ब्लू म्हणजेच भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून त्यांचा दुसरा ICC पुरुष T20 विश्वचषक जिंकला. जेतेपद जिंकल्यानंतर इतर संघांप्रमाणेच, रोहितच्या नेतृत्वाखालील संघ मुंबईत एअरपोर्टपासून मरीन ड्राइव्ह ते प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियम येथे 5:00 वाजल्यापासून उत्सव साजरा करण्यासाठी ओपन-टॉप बस राईड करणार आहे.

रॅलीचे नियोजन पाहता अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

कर्णधार रोहित शर्माकडून ट्विटरवर पोस्ट

“आम्हाला तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद लुटायचा आहे. चला तर मग 4 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडसह हा विजय साजरा करूया,” रोहितने ट्विटरवर पोस्ट केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी बुधवारी जाहीर केले की त्यांनी उद्या मुंबईत विजयी टीम इंडियासाठी ओपन-टॉप बस परेड आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

16 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जिंकला T20 विश्वचषक

16 वर्षांपूर्वी, जेव्हा टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला T20 विश्वचषक जिंकला तेव्हा धोनीच्या संघाने मुंबईत ट्रॉफीसह बस परेड आयोजित केली होती. 2007 T20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला, जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून ट्रॉफी जिंकली.

टीम इंडिया बार्बाडोसहून परतल्यानंतर दिल्लीहून मुंबईत येणार आहे. त्यानंतर इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात येणार आहे. खुल्या बसमधून विश्वविजेता संघ वर्ल्डकप ट्रॉफीसह प्रवास करेल. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा BCCI सचिव जय शाह यांच्याकडे विश्वचषक ट्रॉफी सुपूर्द करेल. ही ट्रॉफी पुढील दोन वर्षे बीसीसीआयच्या मुख्यालयात राहील.


हेही वाचा

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे स्मारक उभारण्यात येणार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *