[ad_1]
बागलाण तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवोदित खेळाडूंसाठी जी काही मदत लागेल त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले. नामपूर येथे ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक क्रिकेट सोहळ्याच्या उद्
.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे भाऊसाहेब अहिरे, जगदीश सावंत, अमित पगार, संदीप कापडणीस यांच्यासह परिसरातील विविध राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चषक क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण यू-ट्यूबच्या माध्यमातून पर्वणी ठरणार आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत १६ संघांनी सहभाग नोंदवला आहे.
५ जानेवारीला स्पर्धेचा समारोप होणार आहे. प्रथम विजयी संघास आमदार दिलीप बोरसे यांच्यातर्फे एक लाख रुपये व तुळजाई ट्रेडर्स चषक, द्वितीय बक्षीस माउली कन्स्ट्रक्शनचे भाऊसाहेब अहिरे यांच्याकडून ७१ हजार रुपये चषक, तिसरे बक्षीस सनी ग्रुप ५१ हजार रुपये व चषक, चौथे बक्षीस ३१ हजार रुपये पुणेश ठाकरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन किशोर पगार, राजेंद्र पवार, स्नेहराज सावंत, सचिन कापडणीस यांच्यासह इतरांनी केले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply