[ad_1]
कळमनुरी तालुक्यात अवैधरित्या गौण खनीज भरलेले पाच टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून महसूल प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी ता. 11 पहाटे हि कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
.
जिल्हाभरात अवैधरित्या गौण खनीज उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी पोलिस विभागासह महसूल प्रशासनाकडे दिल्या जात होत्या. त्यावरून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैधरित्या होणारी गौण खनीज वाहतूक रोखण्यासाठी तातडीने पथके स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे पोलिस विभागानेही कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
कळमनुरी तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन केली आहेत. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी अशोक केंद्रेकर, गंगाराम बेले, गणेश धाडवे, नागेश कांबळे, महेश गळाकाटू, अमोल गंगावणे, पंजाब होडबे, कैलास मोगले, मन्सूर शेख, दगडुजी बाट व महसूल सेवक पांडुरंग माने व भिवाशंकर क्षीरसागर यांच्या पथकाने आज पहाटे अडीच वाजता डिग्रस बुद्रूक ते रामेश्वर तांडा शिवारात पाहणी केली असता तेथे एका ठिकाणी मुरुम भरलेले पाच टिप्पर दिसून आले. या पथकाने पाचही टिप्पर ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणले आहेत.
त्यानंतर या पथकाने माळेगाव ते पुसद मार्गावर तपासणी करून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून कळमनुरी पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. एकाच रात्रीच सहा वाहने जप्त करून महसूल प्रशासनाने अवैधरित्या गौणखनीज वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
[ad_2]
Source link
Leave a Reply