[ad_1]
उद्धव ठाकरे हे जर देवेंद्र फडणवीस यांचे शत्रू नाही तर त्यांचा पक्ष का फोडला? दुसऱ्या पक्षाला त्यांचे चिन्ह का देण्यात आले? त्यांचे 40 आमदार वेशांतर कडून तोडले अन् त्यांच्यातील एकालाच मुख्यमंत्री केले, या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनीही विचार करायला हवा, अ
.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपकडून महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशभरात भाजपच्या काळात पक्ष फोडायचे आणि चिन्ह चोरण्याचे काम राजाश्रयात झाले आहे.
माध्यमांवर ह्या चर्चा करायला नको
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मविआबद्दल माध्यमांशी बोलण्यापेक्षा चर्चा करत निर्णय घ्यायला हवा, ते त्यांच्या पक्षाचे मत मांडत असतात, असे ठाकरे गटाने मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यावर बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी असे म्हटले आहे.
मविआ एकत्र रहावी हाच प्रयत्न
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की,आम्ही कायम महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केला आहे. आमच्या पक्षाचे वरीष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेत असतात. पक्षश्रेष्ठीसोबत या विषयी आम्ही चर्चा करु.
मविआमुळे मुंबईत जागा लढवता आल्या नाही
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला संधी मिळाली पाहिजे. मुंबईमध्ये आमच्या सीट निवडून येऊ शकल्या असत्या. पण मविआमुळे आम्हाला तिथे निवडणूक लढवता आली नाही. पण मविआची जागा निवडून यावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आघाडी धर्म आम्ही पाळला. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा आम्हाला काही जागा सोडाव्या लागल्या. यात मलाही लोकसभा निवडणुकीत वेगळ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.
आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा ते आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. संजय राऊत त्यांच्या पक्षाचे निर्णय सांगतात. आम्ही आमच्या पक्षाचे निर्णय झाला की तुम्हाला सांगू.
ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार- राऊत
मुंबई ते नागपूपर्यंत सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वळावर लढण्याचे सांगितले आहे. या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी तशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते? असे देखील ते म्हणाले. आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा पक्षाच्या वाढीला देखील फटका बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
[ad_2]
Source link
Leave a Reply