अनधिकृत फटका विक्री केंद्रावर कारवाई: परवाना न घेता विक्री करणाऱ्यांचे फटाके केले जप्त – Ahmednagar News

[ad_1]

राहाता नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध प्रभागात सुरू असलेल्या अनधिकृत विनापरवाना फटाका विक्री केंद्रांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके जप्त करण्यात आले असून त्याची शासन नियमानुसार विल्हेवाट लावली जाणार आहे. न

.

राहाता नगरपालिकेने वीरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस पत्र्याचे शेड मारून फटाका विक्री केंद्रांना जागा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी याच ठिकाणी फटाका विक्रीचे स्टॉल लावले जातात. येथे फटाका विक्री करणाऱ्या दुकानदारांना विक्री बाबतचे शासन नियमांचे तसेच फटाका परवाना घेणे बंधनकारक आहे. असे असताना मात्र पालिकेने ठरवून दिलेल्या जागेऐवजी अनेकांनी अनधिकृतपणे पालिकेची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना फटाका विक्री केंद्र सुरू केले होते. ही बाब मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमून शहरातील अनधिकृत विनापरवाना फटाका विक्री केंद्रांवर धाडी टाकून ही बेकायदा व विनापरवाना सुरू असलेली फटाका विक्री बंद केली. वास्तविक नागरी वसाहतीत किंवा त्यालगत अग्नीरोधक उपाययोजना नसताना तसेच फटाका विक्रीचा परवाना न काढता फटाके विक्री करण्यावर बंदी आहे. असे असताना काही दुकानात फटाके विक्री सुरू होती. रहिवास क्षेत्र किंवा खासगी जागेत, दुकानात, घरासमोर अथवा गोडाऊनमध्ये फटाके विक्री केंद्र चालवणे धाक्याचे आहे. रहिवास क्षेत्रात ज्वलनशिल पदार्थ विक्रीस बंदी असल्यामुळे अशी विक्री केंद्र ही अनाधिकृत असतात. या अनाधिकृत फटाका विक्री केंद्रांचा शोध घेऊन अनाधिकृत फटाका विक्री केंद्र व्यावसायिकांवर कारवाई करणे आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आली. फटाके जप्त करून सदर फटाके नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन येथे दफन करून विल्हेवाट लावली जाणार आहे. अनधिकृत फटाका विक्री केंद्रांवर कारवाई करणाऱ्या पथकांमध्ये राहुल प्रकाश खलिपे, नोडल अधिकारी आकाश वाघमारे, अन्वर युनुस शहा, प्रवीण पगारे, दिलीप सोनवणे, फिलीप दुशिंग, केशव बोठे, अनिल कुंभकर्ण आदींचा समावेश होता.

विनापरवाना फटाके विक्री न करण्याच्या पालिकेने दिल्या होत्या सूचना

ठरवून दिलेल्या जागेत फटाका विक्री केंद्र सुरू करणाऱ्या संबंधित दुकानदारांवर नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. कारवाई करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने त्यांना विनापरवाना फटाका विक्री केंद्र चालवू नये, यासह त्यासंबंधीच्या नियमांबाबत सूचना दिली होती. विक्री केंद्र बंद करण्याबाबत सांगितले होते. यावर काहींनी दखल घेऊन आपली दुकाने बंद केली. मात्र काहींनी चालू ठेवली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *