धनुभाऊ, छगन भुजबळ पुन्हा आले आणि पुन्हा झाले या खात्याचे मंत्री!

[ad_1]

मुंबई, 14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीमचा अखेरीस विस्तार झाला असून आज 12 दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना नवीन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे आता कृषि खात्याची जबाबदारी असणार आहे. तर छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न आणि नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर झाला आहे. अलीकडेच दाखल झालेले अजित पवार यांच्याकडे आता तिजोरीच्या चाव्या असणार आहे. तर अनेक मंत्र्यांची खाती कमी करण्यात आली आहे. पण कुणालाही डच्चू दिलेला नाही. काही मंत्र्यांची खाती काढून ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना वाटण्यात आली आहे.  शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खाते काढून घेण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडील कृषि खाते आता धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. याआधी महाविकास आघाडी सरकार असताना धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग हे खाते होते. त्यामुळे आता दुसऱ्यांदा धनंजय मुंडे मंत्री झाले आहे.

News18लोकमत


News18लोकमत

तर छगन भुजबळ यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. याआधी हे खाते भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पण आता हे खाते भुजबळांकडे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकार असताना छगन भुजबळ यांच्याकडे हेच खाते होते. दोन्ही सरकारमध्ये भुजबळ यांच्याकडेच समान खाते राहिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *