[ad_1]
- Marathi News
- International
- Musk’s Entry Into German Politics, Support For The Right wing AfD Party, Interview With AfD Party Leader Eiss A Month And A Half Before The Elections
बर्लिन/न्यूयॉर्क14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उघडपणे रिपब्लिकन उमेदवारांना समर्थन देणारे अमेरिकी टेक अब्जाधीश एलन मस्क यांनी आता युरोपमधील राजकारणात उडी घेतली आहे. जर्मनीत दीड महिन्यांनंतर २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीआधी मस्क यांनी जर्मनीत उजव्या विचाराचा पक्ष अल्टनेटिव्ह फॉर जर्मनीच्या(एएफडी) चान्सलरपदाच्या उमेदवार एलिस वीडेल यांच्यासाेबत एका लाइव्ह-स्ट्रीमवर चर्चा केली. सुमारे ७४ मिनिटांच्या या मुलाखतीदरम्यान मस्क यांनी एएफडीप्रति आपल्या समर्थनाची पुनरावृत्ती केली. त्यांनी जर्मनवासीयांना आवाहन केले की, त्यांनी निवडणुकीत या पक्षाला मतदान करावे. मस्क म्हणाले, केवळ एएफडीच जर्मनीला वाचू शकते. त्यांनी पक्षाच्या धोरणाचा बचाव करत ती सामान्य ठरवली.
सर्व्हे : सर्व पक्ष बहुमतापासून दूर, दुसऱ्या स्थानी एएफडी
मस्क यांनी जर्मनीत आपल्या महत्त्वाच्या गुंतवणुकीचा हवाला देत हस्तक्षेप योग्य ठरवला आणि सांगितले की, एलिस जर्मनीला चालवण्यासाठी योग्य उमेदवार आहेत. निवडणूक सर्वेक्षणाबाबत बोलायचे झाल्यास गार्डियनच्या सर्व्हेनुसार, जर्मनीत सध्या कोणत्याही पक्षाला बहूमत मिळताना दिसत नाही. नुकताच राजीनामा दिलेले ओलाफ शुल्फ यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर तर एएफडी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
माजी चान्सलर शुल्झना मस्क मूर्ख म्हणाले होते
एलिस वीडेल आणि मस्क यांच्या चर्चेत ऊर्जा धोरण, जर्मन नोकरशाही, ॲडोल्फ हिटलर, मंगळ ग्रह आणि जीवनाचा अर्थ यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. एलिस म्हणाले, त्यांचा पक्ष परंपरावादी आणि स्वातंत्र्यवादी आहे. मात्र, मुख्यधारेत मीडियाद्वारे त्यास नकारात्मक पद्धतीने कट्टरपंथीच्या रूपात सादर केले. एलिस यांनी घोषणा केली की, हिटलर प्रत्यक्षात एक कम्युनिस्ट होता, यानंतरही नाझी नेत्याचे उल्लेखनीय साम्यवादविरोधी विचार होते. ज्याने सोव्हियत संघावर आक्रमण केले होते. एलिस म्हणाल्या, तो रुढीवादी नव्हता, तो स्वातंत्र्यवादी नव्हता.ङ तो साम्यवादी, समाजवादी व्यक्ती होता. मस्कनी याआधी एएफडीला अति उजवा ठरवणे फेटाळले आहे. त्यांनी माजी चान्सलर ओलाफ शुल्झ यांना मूर्ख म्हटले होते. दुसरीकडे, शुल्झ चान्सलर पदावर राहण्याची शक्यता खूप कमी असल्याचे म्हटले आहे.
मस्क यांच्या हस्तक्षेपावर आमचे लक्ष : युरो. आयोग
- मस्क यांनी जर्मन राजकारणात आपल्या भागीदारीचा बचाव केला. त्यांनी टेस्लाच्या युरोपीय संयत्रासह आपल्या महत्त्वाच्या गुंतवणुकीचा हवाला दिला.
- युरोपीय संघाच्या नेत्यांनी मस्क यांच्या राजकीय प्रभावावर चिंता व्यक्त केली. युरोपीय आयोग आपली डिजिटल सेवा अधिनियमाअंतर्गत या घटनेवर निगराणी करत आहे. जर्मन अधिकारी आढावा घेत आहेत की, या चर्चा मोहिमेत वित्त कायद्याचे उल्लंघन होते किंवा अवैध निवडणूक हस्तक्षेप आहे.
- विडेलचे प्रवक्त्यांनी या कार्यक्रमास एक्सवरील खुली चर्चा ठरवली व अयोग्य आरोप फेटाळून लावले. लॉबी गट आणि खासदारांनी पारदर्शकता आणि निष्पक्षकतेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. जर्मन नागरीक युरोपीय राजकारणात मस्क यांच्या प्रभावावर विभागले आहेत.
[ad_2]
Source link
Leave a Reply