अमेरिका- भारतीयांना विशेष व्हिसा; यंदा 25 हजार लाभार्थी: हार्टलँड स्टेटमधील व्यावसायिकांना काम करण्याची संधी

[ad_1]

न्यूयॉर्कहून भास्करसाठी मोहंमद अली4 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिकेत वास्तव्य करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी नवा मार्ग खुला झाला आहे. कुशल व्यावसायिक भारतीयांसाठी एच श्रेणी व्हिसाचा प्रस्ताव तयार केला आहे. यंदा सुमारे २५ हजार भारतीयांना या श्रेणीतील व्हिसा मिळेल. एच म्हणजे हार्टलँड स्टेटमधील व्यावसायिकांना काम करण्याची संधी दिली जाईल.

हार्टलँड स्टेट मिशिगन, डकोटासारख्या राज्यांना संबोधले जाते. न्यूयॉर्क, टेक्सास व फ्लोरिडासारख्या राज्यांच्या तुलनेत ही राज्ये आर्थिकदृष्ट्या पिछाडलेली आहेत. भारतीय व्यावसायिकांना व्हिसा दिल्यामुळे या पिछाडीवरील राज्यांमध्ये आर्थिक विकासाचा वेग वाढू शकेल, असे बायडेन सरकारला वाटते. भारतीयांचा विचार करून ही श्रेणी तयार करण्यात आली आहे. अमेरिकेत ग्रीन कार्डची दीर्घ प्रतीक्षा असल्याने एच श्रेणीतून कुशल व्यावसायिक येऊ शकतील. अमेरिकेत स्थायिक होण्यास इच्छुक भारतीय कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कसारख्या ठिकाणांची निवड करतात.

१५ हार्टलँड राज्यांत भारतीयांची संख्या कमी

मिशिगन, डकोटा, अलाबामा, कँटुरी, मिसुरी, नेब्रास्का, आेहिआेसारख्या १५ राज्यांत भारतीयांची संख्या अतिशय कमी आहे. अमेरिकन सरकारने या राज्यांतील १०० जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांत भारतीयांना व्हिसा दिला जाणार आहे. एच श्रेणीतील व्हिसामध्ये एक अट आहे. व्हिसा मिळाल्यापासून एक वर्ष त्या व्यक्तीस त्याच जिल्ह्यात राहावे लागेल. यातून व्यावसायिक त्या जिल्ह्याच्या विकासात आपले योगदान देऊ शकेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *